

छत्रपती शिवाजी महाराजांच्या सर्व समकालीन चित्रांचा, त्यांच्या राजयोगी व्यक्तिमत्त्वाचा ऐतिहासिक कागदपत्रांच्या आधारे घेतलेला मागोवा म्हणजेच ‘मऱ्हाटा पातशाह’ गेल्या ६०-७० वर्षांपासून महाराष्ट्रात सर्वमान्य असलेल्या मतांना के तन पुरी यांनी संदर्भानिशी छेद दिला आहे. परदेशी चित्रकारांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काढलेल्या चित्रांचा रंजक प्रवास, त्यासाठी त्यांनी लढवलेली शक्कल या सगळ्यात नजरेसमोर चित्रांचा इतिहास उभा राहतो, त्याचप्रमाणे त्या काळातील भारतीय समाजजीवनाचे काही पैलूही या पुस्तकात वाचायला मिळतात. संशोधनाच्या चौकटीत बसवून कॉपर एनग्रेव्हिंग, हिंदूख्रिश्चन की मुस्लिम ख्रिश्चन, घूसू मुसलमानांच्या जमा बांधण्याच्या पद्धती यासारख्या अनेक तांत्रिक, रंजक आणि अपरिचित बाबी वाचायच्या असतील तर ‘मऱ्हाटा पातशाह’ वाचावेच लागेल.